असलेला गुरुचरित्र पारायण सोहळ्याची आज सांगता झाली. १०० ते १५० महिला व
पुरुष भाविक रोज पहाटे गुरुचरित्राचे वाचन करत होते. आज सकाळी डी.बी
जाधवसर यांनी सपत्नीक स्वामी ची पुजा केली. श्री दत्त महाराज हेच स्वामी
मार्गाचे मूळ असल्याने हा कार्यक्रम सामुदायिकपणे व खूप भक्तीभावाने
करावयाचा असतो. श्री दत्त जयंती निमित्त सर्व सेवेकर्यांनी उपोषण
करावयाचे असते व उपवास दुसर्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला १०॥ चे आरतीनंतर
सोडावयाचा असे या सेवा मार्गाचे वैशिष्ट्ये आहे. या वेळी डी.बी.जाधव
यांनी उपस्थित सेवकऱ्यांना गुरु सेवा , स्वामी समर्थांच्या कार्यांची, व
सेवा केंद्रातील उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.