कृषिमंत्री शरद पवार यांचा शेतक-यांना दिलासा.....कांद्याचे निर्यातमूल्य 150 डॉलर प्रति मे.टन केले.

शरद पवारांचा शेतकऱ्यांना दिलासा..........
कांद्याचे निर्यातमूल्य 150 डॉलर प्रति मे.टन केल्याची खा. समीर भुजबळ यांची माहिती 
नाशिक : कांद्याचे निर्यात मूल्य 150 डॉलर प्रति मे.टन करण्याचा निर्णय केंद्रिय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेण्यात आला असून उद्या त्याची अधिसूचना काढण्यात येणार आहे अशी माहिती ना.पवार यांनी दिल्याचे खा. समीर भुजबळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये
कळविले आहे. काल दि. 24 रोजी नाशिक येथे राष्ट्रवादी भवन उद्घाटन सोहळ्यामध्ये ना. पवार
यांनी कांद्याचे निर्यात मूल्य शुन्यावर आणण्याचा प्रयत्न करू असा शब्द नाशिककरांना दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ना. पवार आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून विशेष विमानाने आज 25 डिसेंबर रोजी दुपारी मनमाडचा कार्यक्रम आटोपुन ओझर विमानतळावरून दिल्लीला गेले. नाताळची सुट्टी
असतानाही त्यांचे दिल्ली येथील निवासस्थानी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा व संबंधीत सर्व अधिकार्‍यांची विशेष बैठक बोलावून उपरोक्त निर्णय त्यांनी घेतल्याची माहितीही या पत्रकान्वये दिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारताबरोबरच पाकिस्तान आणि इराण हे दोन देश प्रामुख्याने कांदा निर्यातदार आहेत, त्यापैकी पाकिस्तानचे निर्यातमूल्य सुमारे 250 डॉलर प्रति मे.टन तर इराणचे 275 डॉलर प्रति मे.टन इतके आहे. त्या तुलनेत भारताचा 150 डॉलर प्रति मे.टन हा दर सर्वात कमी असल्याने त्याचा मोठ्याप्रमाणावर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फायदा होईल. त्याचबरोबर पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा उपरोक्त निर्णयाचा शेतकरी व भारतीय ग्राहक यांच्या संदर्भात आढावा घेऊन आवश्यक फेरबदल करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
कांद्याचे निर्यातमूल्य 1150 डॉलर प्रति मे.टन वरून टप्याटप्याने या निर्यात मूल्यावरून वेळोवेळी एकंदरीत परिस्थिती पाहुन 850 डॉलर पर्यत कमी केला होता.तरीही याबाबत सातत्याने हे निर्यात मूल्य आणखी कमी करावे याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भुजबळ साहेब यांचेकडे जिल्ह्यातील सर्व बाजार कमिट्यांमार्फत
सर्व शेतकरी सातत्याने करीत होते. त्यामुळे ना. पवार साहेबांनी हे निर्यात मूल्य 350 डॉलपर्यंत कमी केले होते. परंतु, हे देखील निर्यातमुल्य अजून कमी करावे अशी सातत्याने मागणी होती त्या पार्श्‍वभूमीवर ना. पवार साहेबांनी हा तातडीचा निर्णय घेऊन 150 डॉलर प्रति मे.टन निर्यात मूल्य केले आहे.


थोडे नवीन जरा जुने