येवला - शहरातील नववसाहतींमधील रस्ताकामांचा सोमवारी शुभारंभ करण्यात
आला. नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते या कामांचे उद्घाटन करण्यात
आले.
नववसाहतींपैकी येथील विठ्ठलनगर भागातील कलावती माता मंदिरासमोरील
रस्त्याच्या खडीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या रस्त्याचे काम
हे देसाई ड्रीम सिटीपर्यंत करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान
आहे. तर, पारेगावरोड परिसरातील गोविंदनगर, दत्तमंदिर कॉलनी, तसेच
गोविंदनगरच्या 16 बंगले भागातील रस्त्यांच्या खडीकरणाच्या कामाचा
शुभारंभही पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नगरसेविका उषाताई
शिंदे, उपनगराध्यक्षा भारती जगताप, नगरसेविका छाया क्षीरसागर, नगरसेवक
मनोहर जावळे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, अभियंता जनार्दन फुलारी,
कैलास टिळे आदी उपस्थित होते.