येवले नगरपरिषद कर्मचार्‍यांना मिठाई वाटप

येवला - येवले नगरपरिषदेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच न. पा.
कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून मिठाई वाटप करण्यात आली. येवल्याचे
नगराध्यक्ष नीलेश पटेल यांनी हा उपक्रम राबविला. पटेल यांनी यापूर्वीही
२६ जानेवारी 'प्रजासत्ताकदिनी' नगरपरिषदेतील गुणवंत कर्मचार्‍यांना
'सन्मानचिन्ह' देऊन गौरव समारंभ आयोजित केला होता.

कामगारांची दिवाळी आनंदात कशी साजरी होईल, याकडे जातीने लक्ष दिल्याने
न.पा. प्रशासनाने विविध फरक व अँडव्हान्स पोटी सुमारे ३0 लाख इतक्या
रकमेचे वाटप कर्मचार्‍यांना केले. येवल्याचा प्रथम नागरिक या भूमिकेतून
शहरवासीयांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून मिठाईवाटप कार्यक्रम घेऊन
कामगारांची दिवाळी गोड करण्याचा छोटासा प्रय▪केल्याची प्रतिक्रिया
नगराध्यक्ष पटेल यांनी कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केली. याप्रसंगी
मुख्याधिकारी डॉ. मेनकर, गटनेते प्रदीप सोनवणे, नगरसेवक रिजवान शेख, माजी
नगरसेवक शफीक शेख यांच्यासह अनेक न.पा. कर्मचारी उपस्थित होते. कामगार
संघटनेचे सचिव शशिकांत मोरे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मंगळवारची
सुटी पूर्ववत सुरू करावी, अतिरिक्त कामाचा मोबदला, सफाई कामगारास घरकुल
योजनेतून घर द्यावे या मागण्यांकडे लक्ष वेधले.
थोडे नवीन जरा जुने