येवला- कर्मचारी वसाहत व कार्यालयासाठी एरंडगाव ग्रामपंचायतीने स्वत:च्या
मालकीची जागा पालखेड पाटबंधारे विभागाला दिली आहे. मात्र सध्या त्या जागेचा
कोणताही वापर होत नसल्याने सदर जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी; अशी
मागणी सरपंच विलास रंधे आणि ग्रामस्थांनी केली आहे. 1974 साली तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पालखेड विभागाला स्व-मालकीची 61 गुंठे जागा दिली होती. 1980 पर्यंत या जागेवर पाटबंधारे विभागाने कर्मचारी वसाहतींसह कार्यालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. त्या ठिकाणी अभियंता व इतर कर्मचारी 1996 पर्यंत वास्तव्यास होते. त्यानंतर मात्र तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आणि कर्मचारी वसाहत सोडून जाऊ लागल्याने पुढे ती पूर्णपणे ओस पडली. या जागेवर काटेरी व झुडूपांचे प्रमाण वाढले आहे. सध्या केवळ कार्यालयाचा वापर पालखेड विभागाकडून होत आहे. आसपासच्या इमारतींची पडझड झाल्याने ग्रामपंचायतीने 'पालखेड'ला दिलेली जागा परत देण्यात यावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे. |