लासलगांव विंचूर भागातील कांदा पिकासाठी पालखेडचे आवर्तन २४ नोव्हेंबरला

(नाशिक):- खडक माळेगाव, टाकळी विंचूर, कोटमगाव, पिंपळद, वाहेगाव, वाकी,
दरसवाडी, लासलगाव इत्यादी परीसरातील कांदा उत्पादक शेतक-यांना पोळ कांदा
पिकाच्या उत्पादनासाठी पाण्याची नितांत गरज असल्यामुळे पाठबंधारे विभागाने
ओझरखेडमधून त्वरीत आवर्तन सोडावे या मागणीसाठी त्र्यंबक रस्त्यावरील वेद
मंदिराजवळ कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर शेतक-यांनी आजपासून आमरण
उपोषण सुरु केले होते. मात्र, कालवा सल्लागार समितीची बैठक २३ नोव्हेंबर ला
होणार असून या बैठकीत ओझरखेडमधून पाणी सोडण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे
नियोजन असल्याची माहिती आ.जयवंतराव जाधव यांनी उपोषणकर्त्या शेतक-यांना दिली.

या परिसरात पाऊस पडलेला नाही. शासकीय आणेवारीही पन्नास टक्याच्या आत आहे.
तहसीलदारांनी केलेल्या पाहणीत टँकर द्वारे पाणी देण्याची आवशक्यता असताना
पाटबंधारे विभाग पाणी सोडत नाही असा आरोप विविध गावचे शेतकरी, पाणीवाटप
समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, आणि टाकळी विंचूरचे सरपंच मारुती राजगिरे,
शिवाजी सुरासे, संतोष बोराडे, नाना राजोळे, वामनराव शिंदे, यांच्यासह सुमारे
दोनशे शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सदर अश्वासन लेखी स्वरुपात दयावे अशी विनंती आ. जयवंतराव जाधव यांनी
उपोषणकर्त्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता आर.ए.शिंपी यांच्याकडे केली. यावर
ठोस निर्णय मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आणि उपोषण मागे
घेतले. यावेळी माजी आ. कल्याणराव पाटील यांनी शेतक-यांची भेट घेतली.
थोडे नवीन जरा जुने