येवला : शहरातील ना.भुजबळ संपर्क कार्यालयाजवळ आणि गंगादरवाजा जवळ असलेल्या नाशिक– औरंगाबाद महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशा व अंतर दर्शक फलकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तथाकथित पुढारी यांनी गेल्या १ महिन्यापासून भुजबळ वाढदिवस शुभेच्छा फलक लावला आहे. त्यामुळे वाहनधारकांत नाराजी आहे. १० ऑक्टोंबर २०१३ लावलेले दोन्ही ठिकाणच्या फलकामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः औरंगाबाद कडे जाणाऱ्या पर्यटकांना याचा जास्त त्रास होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी वाहन उभे करुन स्थानिंकाना रस्ता विचारण्याचे प्रमाण वाढले आहे.
राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोक्याची सूचना, दिशादर्शक देणारे फलक लावले जातात. हे फलक वाहनचालकांना सूचना देण्यासाठी असतात. नवीन वाहनचालकांना मार्ग दाखवण्यासाठीही या फलकांचा उपयोग होतो. मात्र राजकीय मंडळी निव्वळ प्रसिद्धीपोटी आपली शुभेच्छांचे फलक या बोर्डवर लावतात. यामुळे या बोर्डवरील माहिती झाकली जाते. पालकमंत्र्याचा वाढदिवस होऊन महिना उलटला तरी शुभेच्छांचा फलक अजूनही न हटवल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.भुजबळांच्या येवला भेटीत पुढे असणारे स्वय-घोषीत नेत्याच्या या जाहिरातबाजीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला या फलकावरील जाहिराती बेकायदेशीर आहेत याचा विसर तर पडला नाही, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे. तात्काळ संबंधितांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी व या फलकावर दिशा दर्शकाची माहिती देण्याची मागणी प्रवाशी,वाहनचालकांतून होत आहे.