येवला - सुरेगाव रस्ता येथून अटक केलेल्या मेजर ऊर्फ ध्रुवबाळ सुराशे याने नाशिकच्या बाहेरही अवैध शस्त्रविक्री केल्याचे उघड होत आहे. येथील पोलिसांनी आज सातारा येथे छापा टाकून एका संशयिताला पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. काल रात्रीच एकाला नाशिक येथून अटक केल्याने संशयितांची संख्या अकरा झाली आहे.
मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येवल्यातील हॉटेल जीवनधारावर छापा टाकून सर्वप्रथम चौघांना पिस्तुलासह अटक केली होती. त्या वेळी भारम व सुरेगाव रस्ता आणि नाशिक येथेही शस्त्राचे खरेदी-विक्रीचे धागेदोरे सापडले होते. त्यानंतर श्री. कडासने, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समाधान पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काल रात्री नाशिक येथून मित्रांना पिस्तूल लपविण्यासाठी मदत करणाऱ्या अक्षय पिल्ले (वय 18, रा. राणेनगर) याला अटक केली, तर आज सकाळीच विविध पथके तपासासाठी परजिल्ह्यांत गेली होती. यापैकी सातारा येथील पथकाला तपासात यश आले आहे.
साताऱ्यातून एकाला अटक
पोलिस उपनिरीक्षक बी. यू. बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. के. तायडे, हवालदार भाऊसाहेब वाघ, दीपक काकडे, विजय जाधव, ए. एन. मुरडनर आदींच्या पथकाने पिंटू ऊर्फ विजय लाला जाधव (वय 21, रा. वडूंज, जि. सातारा) याला ताब्यात घेतले. विजय जाधव या संशयिताकडून एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक समाधान पवार तपास करीत आहेत.