येवला शहरातील विंचुर चौफुली
लगत असलेल्या सिटी सव्र्हे क्र 3907 व 3908 मधील बेकायदेशीर अतिक्रमित गाळे
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने डिसेंबर २०१२ मध्ये जमिनदोस्त केले होते. सदरच्या जागेवर अतिक्रमण करु नये असे फलक लावून सदरच्या जागेला तार कंपाऊंड ही करण्यात आले होते पण नंतर लगेचच महिन्याभरात गाळेधारकांनी ते काढून पत्र्याचे शेड ठोकले आणिआपले व्यवसाय सुरु केले. सदर ची जनहितयाचिका चालू असून तीची दि. २८ जून २०१३ ला मा.उच्च न्यायालयात कामकाज चालू होते. यावेळी नगरपालिका प्रशासनाला मा. न्यायालयात परत फटकारले असल्याची चर्चा शहरात सुरु असून या परत कब्जा केलेल्याअतिक्रमण धारकावर पुन्हा कारवाई होण्याचे संकेत दिसून येत आहे. नगरपालिका प्रशासनाने पोलिस तक्रार देऊन कारवाई केल्याचा देखावा केला होता. पण आता येवला नगरपालिकेला याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार याची चिन्हे दिसत आहे.
या बरोबरच ज्यांनी जिल्हा न्यायालयात स्थगीती मिळवली आहे त्याचीही कार्यवाही लवकरच होईल अशी चर्चाशहरात सुरु आहे.
अधिक माहिती लवकरच येवलान्यूज.कॉमवर वाचा.......................................
या बरोबरच ज्यांनी जिल्हा न्यायालयात स्थगीती मिळवली आहे त्याचीही कार्यवाही लवकरच होईल अशी चर्चाशहरात सुरु आहे.
अधिक माहिती लवकरच येवलान्यूज.कॉमवर वाचा.......................................