येवला - दि .२७ (अविनाश पाटील) ना.भुजबळाच्या मतदार संघातील येवला कृषी
उत्पन्न बाजार समितीने वाजतगाजत सुरु केलेल्या बाजारभाव एसएमएस सेवा
लगेचच बंद पडलेली आहे. तसेच गाजावाजा केलेली वेबसाईट www.apmcyeola.com
ने केव्हाच अखेरचा श्वास घेतला आहे. पिण्याच्या पाण्याची टाकीचे नळ
नादुरुस्त दिसून येतात. बाजार भावासाठी असलेला ईलेक्ट्रॉनिक्स डिस्पले
सिस्टीमही बंदच पडलेली आहे. मोठ्या दिमाखात येवला कृषी उत्पन्न बाजार
समितीने आपले इ.स . २०१३ दिनदर्शिकेवर मा.ना.भुजबळ यांचे
छायाचित्राबरोबरच दिमाखात वेबसाईटचे नाव टाकले आहे. पण ह्या वेबसाईटशी
सबंधीत माहिती इंटरनेटवर तपासली असता ही वेबसाईट २०१२ रोजीच मुदत संपली
आहे. ती रिन्युयल करणे गरजेचे असताना अडाणी सचिव व कर्मचारी तसेच शिक्षीत
असलेले पदाधिकारी याविषयी गप्प आहे. वास्ताविक पाहता कमीत कमी ५ वर्षाचे
डोमेन व होस्टींग प्लॅन घेणे कोटींनी उलाढाल करणाऱ्या बाजार समितीला महाग
नव्हते परंतू फक्त वरून आलेले अनुदान अथवा निधी हडप करण्यासाठी फक्त
देखावा करण्यासाठी वेबसाईट केल्याचा संशय आहे. बीएसएनएल च्या कृषी संचार
योजनेतील बहुतेक शेतकरी ग्राहक आपल्याला दरमहिन्याला मिळणारा १ जीबी डाटा
वापरत असतात. म्हणजेच तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक माहिती तंत्रज्ञानात
पारंगत झाला असून तो शहाणा झाला आहे. पण ऊठसुठ ना.भुजबळांच्या
मार्गदर्शनाखाली प्रगतीचा नारा मिरवणारे बाजार समितीचे चेअरमन व संचालक
गेल्या ८ महिन्यापासून बंद असलेल्या वेबसाईट बाबत अनभिज्ञ आहेत. रोजचे
बाजारभाव वेबसाईटवर टाकणारे कर्मचारी व सचिव यांना सुध्दा हा घोळ लक्षात
आला नाही का हा प्रश्न उपस्थित होतो. एसएमएस तर नावालाच चालू झाले .
सीडीएमए नेटवर्कच्या मोबाईल ला एसएमएस जात नव्हते नंतर मिस्ड कॉल एसएमएस
चालू केले ते केव्हा बंद झाले ते ही समजले नाही. काही लोक आज एसएमएस येईल
या आशेवर तो नंबर डायल करीत राहतात.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अनुभव असणारे कर्मचारी व स्वतः
त्याबाबतीत अडाणी असलेला सचिव आणि फक्त पदासाठी आणि आर्थिक लाभासाठी
नेतृत्व करणारे पुढारी हेच याला जबाबदार आहेत.