अंगणवाडी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार.............

येवला (प्रतिनिधी) येथील अंगणवाडी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याने
नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष चांगदेव जाधव यांनी ना. छगन
भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प २
मध्ये अंगणवाडी भरती प्रक्रियेत गैरप्रकार उघडकीस आला असून अनेक पात्र
उमेदवारांना थेट नियुक्ती नाकारण्याताली आली आहे. सदर प्रकल्पाचे
बालविकास प्रकल्प अधिकारी के.एस.बागुल यांनी सौ.हर्षल विशाल काटे, सौ
ताईबाई सोनवणे आदी अनेक पात्र उमेदवारांना डावलून संबंधीत पदे रिक्त
असल्याची जाहीरात दिली आहे. याबाबत सौ.काटे सौ.काटे व सौ.सोनवणे यांनी
ना.भुजबळांकडे लेखी तक्रार दिली आहे. सदर उमेदवारांवरील अन्याय दुर न
झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा श्री.जाधव यांनी सदर निवेदनाद्वारे दिला
आहे.
थोडे नवीन जरा जुने