बोलण्यात गुंतवुन स्टेट बँकेतून लांबवीले १९ हजार

येवला – येथील स्टेट बँकेत पैसे भरणा करण्यासाठी गेलेल्या इसमाचे १९
हजार रुपये लांबवीले गेले. या प्रकरणी येवला शहर पोलिसात दोन अनोळखी
चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे भरण्यासाठी बँकेत
चलनावर नोटांचे विवरण लिहीत असताना दोघा अनोळखी इसमानी रोख १९ हजार रुपये
इतकी रक्कम लांबविल्याची फिर्याद सचिन राजाराम देशमुख (२५) रा.उंदिरवाडी
याने शहर पोलिसात दिली. मंगलवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सदर घटना
घडली. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मित्राकडून घेतलेले पैसे
परत करण्यासाठी सचिन देशमुख स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी चलन भरीत असताना
दोघा अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवले त्या दरम्यान पैसे
लांबवले. शरीराने धडधाकट , रंगाने गोरा, गोल चेहरा,डाव्या कानात बाळी,
अंगात फुलबाहीचा चॉकलेटी शर्ट सफेदरंगाची पँट तर दुसरा शरीराने सडपातळ
सावळा रंग, उंची कमी, उभट चेहरा, अंगात सफेद काळा पट्ट्याचा शर्ट
डोक्यावर भुरकट रंगाची कॅप परिधान केलेला होता. याचे सिसिटीव्ही
कॅमेऱ्यात चित्रण झालेले असून अधिक तपास पो.हवालदार मधुकर उंबरे करीत
आहे.
थोडे नवीन जरा जुने