येवला - येथील कै. नारायणराव पवार पतसंस्थेस गत आर्थिक वर्षात ५१ लाख
रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थापक, माजी आमदार मारोतराव पवार यांनी
दिली. पतसंस्थेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलीच नेत्रदीपक वाटचाल
केली आहे. संस्थेचे १२७८ सभासद आहेत. संस्थेकडे १८ कोटी ६५ हजार ठेवी असून,
विविध व्यावसायिकांना संस्थेने १६ कोटी ६५ हजार ठेवी असून, विविध
व्यावसायिकांना संस्थेने १६ कोटी १५ लाख रुपये देऊ केले आहे. संस्थेचे
भागभांडवल १0 लाख ३ हजार रुपये असून, गुंतवणूक ५ कोटी १४ लाख रुपये आहेत.
संस्थेचा राखीव निधी ४१ लाख ६३ हजार रुपये आहेत, तसेच इमारत निधी ४७ लाख
रुपये असून, इतर निधी २५ लाख ५५ हजार आहे. संस्थेचे अप्पासाहेब खैरनार,
संभाजी पवार व संचालक मंडळामुळे संस्था प्रगतीपथावर आहे.