येवला - तालुक्यातील कुसूर येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता नववी
उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी ज्ञानसमृद्धी वर्ग सुरू करण्यात
आले. सरपंच दत्ता गायकवाड यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उद्घाटन झाले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामनाथ पाटील होते. विद्यार्थ्यांना
ज्ञानसमृद्धी वर्गाच्या निमित्ताने चांगली संधी उपलब्ध झाली असून, जिद्द
आणि चिकाटीने अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना यश निश्चित मिळेल असा
विश्वास व्यक्त करून या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन
सरपंच गायकवाड यांनी केले. दुष्काळी परिस्थितीमुळे इयत्ता पाचवी ते
आठवीच्या विद्यार्थ्यांना सुटी काळातही शासनाने शालेय पोषण आहार देण्याचे
आदेश दिले असल्याने विद्यार्थ्यांनी पोषण आहाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन
मुख्याध्यापक पाटील यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नवनाथ शिंदे
यांनी तर रमेश पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास अण्णा गायकवाड, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.