मुक्या जनावरांची क्षुधा शांती करून साजरा केला वाढदिवस



येवला - दि.22 (अविनाश पाटील) - येवला मर्चंट बॅकेचे माजी चेअरमन व संचालक परेश पटेल यांच्या वाढदिवसानिमीत्त आज गोशाळा येवला येथे गायींना
टेम्पोभर हिरव्या चाऱ्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही बडेजाव न करता परेश पटेल यांच्या मित्र मंडळींनी त्यांचा वाढदिवस मुक्या जनावरांची पोटपाण्याची व्यवस्था करून साजरा केला. वाढदिवस या पध्दतीने साजरा करण्याची कल्पना माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व गोपाळ काबरा यांनी मांडली त्याला पारेगांव चे सरंपच रवि काळे यांनी मुर्त सवरुप देऊन पुर्णत्वास नेले. या प्रसंगी परेस पटेल, भोलानाथ लोणारी, बापू काळे, रवि काळे, संजय पवार, विष्णू कऱ्हेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

थोडे नवीन जरा जुने