येवला - माहेरून व्यवसायासाठी पाच लाख रु. आणत नाही म्हणून छळ करीत असल्यामुळे विजया अनिल देशमुख रा. रुई ता.राहता जि. अ.नगर ह.मु. अंदरसूल या विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात पतीविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. तालुका पोलिसांनी भा.द.वि ४९८ (अ),३२३,५०४,५०६,३४ या प्रमाणे पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सौ . विजया देशमुख यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन वर्षांपासून ते ८ फेब्रूवारी २०१३ पर्यंत पती अनिल दत्तात्रय देशमुख रा. रुई ता. राहता यांचे त्यांच्या मैत्रीण ज्योती लोखंडे हीचेशी जास्त संबंध वाढल्याने घरात किरकोळ कारणावरून पती अनिल देशमुख आपणास मारहाण शिवीगाळ व दमदाटी करीत असे तसेच प्लॉटच्या व्यवसाय करणे कामी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये अशी सतत मागणी केली. सदर मागणी पुर्ण होत नाही म्हणून मैत्रीणीच्या सांगण्यावरून पती अनिलने माझ्या अंगावरील सर्व दागिने काढून घेतले व मला मुलांसह अंदरसूल येथे माहेरी आणुन सोडले. या प्रकरणी तालुका पोलिसांनी विवाहीतेचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल केला असून . याबाबत अधिक तपास श्री.माळी करीत आहे.