येवला, दि. २१
(प्रतिनिधी) - महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत लोकसहभाग व शासन
समन्वय या माध्यमातून येवला तालुक्यात शंभर पाझर तलावांतील गाळ काढण्याचे
काम सुरू आहे. त्यापैकी पूर्ण झालेल्या १९ जणांना ३ लाख ५१ हजारांचे धनादेश
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात
आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
जि.प.च्या ४ थी ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप भुजबळांच्या हस्ते करण्यात आली. तालुक्यात म. फुले जलभूमी संधारण अंतर्गत पाझव तलावातील गाळ काढण्याच्या कामात ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग नोंदविला. गाळ काढण्यासाठी स्वत: सहभाग घेत इंधनासाठी खर्च केला. त्या लोकांना धनादेश देण्यात आले, तसेच बाळापूर येथे पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा कामाची पाहणी ना. भुजबळांनी केली. यावेळी लवकर काम मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या. उंदीरवाडी येथे पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामासही भुजबळांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अंबादास बनकर, साहेबराव मढवई, सभापती राधिका कळमकर, दीपक लोणारी, साईनाथ मोरे, प्रवीण गायकवाड, के. आर. गुंड, नवनाथ काळे, भारती जगताप, राजश्री पहिलवान, अयोध्या शर्मा, जयश्री लोणारी, विक्रम गायकवाड, मकरंद सोनवणे, रवी जगताप, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, सचिन कळमकर, मोहन शेलार, प्रदीप सोनवणे, मनोहर जावळे, अशोक संकलेचा आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, रा.काँ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.