येवला- येवला तालुक्यातील वाघाळे येथील शेतकरी एकनाथ कारभारी सोमासे यांचा धारदार शस्राने खून झाला असून या प्रकरणी योगेश्वर एकनाथ सोमासे याने येवला तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयीत आरोपी म्हणून अशोक तुकाराम सोमासे, बाबासाहेब तुकाराम सोमासे, सुभाष रंभाजी सोमासे, बाबासाहेब रघुनाथ सोमासे, योगेश बारकु काळे, बाळु जयराम काळे या सहा जणांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली असून या गुन्हा्याला जमिनीच्या बांधाच्या वादाची पार्श्वभूमि असल्याचे समजते. अधिक तपास पो.नि. सुरेंद्र शिरसाठ करीत आहे.