येवला - 'पुस्तक हे आपले गुरु मित्र आहेत. ते आपल्यावर चांगले संस्कार करतात, योग्य मार्गदर्शन करतात. म्हणून पुस्तक सतत वाचली पाहिजे. वाचन संस्कृती वाढावी म्हणून धडपड मंचने सुरू केलेले मोफत वाचनालय म्हणजे हा एक स्तुत्य उपक्रम आहे', असे उद्गार ब्रम्हकुमारी नीता दीदी यांनी मोफत वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. येथील धडपड मंचतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुटीतील मोफत बाल वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयाचा उद््घाटन समारंभ येवला र्मचन्ट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात पार पडला. या वाचनालयाचा लाभ घेण्यासाठी मुला-मुलींनी प्रचंड गर्दी केली होती. यात ५ वी ते ८ वीपर्यंतच्या मुला-मुलींचा सहभाग होता. यावेळी पालकवर्ग उपस्थित होता. नारायणमामा शिंदे, दत्तात्रय नागडेकर यांनी मुलांना मार्गदर्शनपर भाषणे केली. सुधीर गुजराथी, अविनाश पाटील हे यावेळी उपस्थित होते. |