येवला - गुढीपाडवा, मराठी
नववर्षानिमित्त शहरातून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील श्री
सुंदरराम मंदिर प्रांगणात गुढीपाडव्यानिमित्ताने श्रीराम कथा आनंद
सोहळ्याचा दिमाखदार शुभारंभ झाला. शहरातून सकाळी ८ वाजता रथयात्रा काढण्यात
आली. प. पू. चक्रांकित महाराज यांच्या उपस्थितीत निघालेल्या या
शोभायात्रेत अग्रभागी कलशधारी मुली सहभागी झाल्या होत्या. महिलांचे नऊवारी
साडीतील लेझीम पथक खास आकर्षण ठरले होते. शोभायात्रेत शहरवासीय मोठय़ा
संख्येने सहभागी झाले होते.