(येवला) : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
अर्थात 'म्हाडा' च्या नाशिक विभागीय सभापतीपदी
येवल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र भिकाजी दराडे यांची आज राज्य
शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असणार आहे. सदर
नियुक्ती तीन वर्षासाठी असून आपल्या कार्यकाळात गोरगरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध
करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ओबीसींचे नेते
आणि नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केलेल्या या नियुक्तीमुळे वंजारी
समाजाला न्याय मिळाल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री भुजबळ यांनी दाखविलेल्या
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे काम आपण करू असेही नवनिर्वाचित सभापती नरेंद्र
दराडे यांनी सांगितले. या नियुक्तीमुळे दराडे यांच्यावर संपूर्ण उत्तर
महाराष्ट्रातून तसेच राज्यभरातील हितचिंतक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दिनांक २३/८/१९९२ रोजी म्हाडा कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे. नाशिक मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक येथे असून त्याअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्हयांचा समावेश आहे. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
यापूर्वी दराडे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एनडीसीसी ) उपाध्यक्षपद आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद
भूषविले आहे. खा. समीर भुजबळ यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या
निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची शिफरस केली होती. नव्या नियुक्तीने आपल्यासारख्या
छोट्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्यामुळे ना. भुजबळ यांनी दिलेला शब्द पूर्ण
केल्यामुळे त्यांचे आभार मानल्याचे दराडे म्हणाले.
या पदावर असताना औद्योगिक कामगार गृह निर्माण वसाहत, अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटासाठी न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे ते म्हणाले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची स्थापना दिनांक २३/८/१९९२ रोजी म्हाडा कायदा १९७६ च्या कलम १८ अन्वये झाली आहे. नाशिक मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक येथे असून त्याअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्हयांचा समावेश आहे. हे विभागीय मंडळ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, मुंबईच्या अधिपत्य व नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
यापूर्वी दराडे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी
या पदावर असताना औद्योगिक कामगार गृह निर्माण वसाहत, अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटासाठी न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असे ते म्हणाले.