पाटोदा व अंदरसूल शिवारात आढळले दोन पुरुषांचे बेवारस मृतदेह

येवला - तालुका परिसरातील पाटोदा व अंदरसूल शिवारात पुरुषांचे दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

येवला पाटोदा रोडवर रिलायन्स टॉवरजवळ एक अंदाजे ५५ वर्ष वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंगात चॉकलेटी रंगाची पॅन्ट, पांढर्‍या रंगाचा धारेचा मळकट शर्ट, डोक्याचे, दाढीचे केस वाढलेल्या अवस्थेत असे वर्णन आहे. याबाबतचा तपास हवालदार पेहेरकर करीत आहेत. येवला-वैजापूर रस्त्यावर अंदरसूल शिवारात नॅशनल कॉटन फायबर कंपनी समोर एका ७0 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. सफेद शर्ट व धोतर परिधान केलेला, रंगाने सावळा असा वृद्ध मृतावस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्याशी (0२५५९-२६५0७३) संपर्क साधावा .
     
थोडे नवीन जरा जुने