येवला येथील स्वागत गॅस
एजन्सीचे संचालक व विक्री अधिकारी बीपीसीएल यांनी संगनमत करून खोटे
दस्तावेज तयार करून भ्रष्ट वितरण केल्याबाबत त्यांच्यावर जीवनावश्यक कायदा
१९५५ अन्वये तात्काळ पोलीस कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन
तहसीलदारांना देऊ न ग्राहक पंचायतच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर उपोषण
करण्यात आले. लेखी आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.येथील
स्वागत गॅस एजन्सी यांचे भ्रष्ट व अकार्यक्षम वितरण व्यवस्थेबाबत
नागरिकांनी हजारो तक्रारी केल्या आहेत. दक्षता समितीच्या मासिक बैठकीतही हा
नेहमी चर्चेचा विषय ठरला असून, यासाठी वारंवार मोर्चे, आंदोलनही करण्यात
आले आहेत. तत्कालीन तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांना कळवूनही
कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ग्राहकांना पूर्वसूचना न देता गॅस कार्ड
अपात्र ठरविणे, केवायसी फॉर्मचे
१0 रुपये घेणे, पोहोच न देणे, सबसिडीच्या गॅस पासून ग्राहाकांना वंचित
ठेवणे, पात्र धारकांना अपात्र ठरविणे, गोडावूनमधून टाकी आणल्यानंतर रिबीट
वजा न करता पूर्ण बिलाप्रमाणे पैसे घेणे, ग्रामीण भागात अधिकृत
व्यक्तींकडून गॅसचे वितरण होत नाही, ग्राहकांच्या नावावर बिले काढणे, तसेच
कंपनीकडून उडवाउडवीची उतरे देणे आदी मागण्यांसाठी आज ग्राहक पंचायतचे हरीष
पटेल, प्रभाकर झाळके, संतोष गायकवाड, दीपक पाटोदकर यांनी लक्षणिक उपोषण
केले. याची दखल घेत तहसीलदारांनी अधिकार्यांकडून लेखी आश्वासन घेतले