येवला आगारातील वाहक-चालकांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी

येवला- नियोजित मार्गाने बस फेर्‍या पूर्ण न करता चुकीच्या मार्गाने बस चालविणार्‍या येवला आगारातील वाहक-चालकांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी हिरालाल घुगे यांनी एका निवेदनाद्वारे संबंधितांकडे केली आहे. येवला आगारातून नागडे, बल्हेगाव, मातुलठाण, पाटील वस्ती, नगरसूल, पिंपळखुटे, आहेरवाडी या नियोजित मार्गाने बस धावतात, मात्र गेल्या चार-पाच वर्षांत संबंधित वाहक, चालकांनी नियोजित मार्गाने बस फेर्‍या पूर्ण न करता चुकीच्या मार्गाने बस फेर्‍या पूर्ण केल्याची माहिती अधिकारात उघड झालेली असून, स्थानिक प्रशासन या कर्मचार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून चुकीच्या मार्गाने बस फेर्‍या पूर्ण केल्याने एसटीचे आर्थिक नुकसान झाल्याचे घुगे यांनी सदर निवेदनात म्हटले आहे. येवला आगारातून ग्रामीण भागासाठी असणार्‍या बहुतांशी बसेसला फलक लावला जात नाही. नसल्याने प्रवाशीवर्गाची मोठी गैरसोय होते, अशी तक्रारही सदर निवेदनात करून या प्रश्नी १ एप्रिल रोजी येवला आगारासमोर ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशाराही हिरालाल घुगे यांनी शेवटी दिला आहे.
थोडे नवीन जरा जुने