येवला- येवला शहर हद्दीत झालेल्या दोन मोटार सायकल अपघातात दोनजण ठार झाले असून एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. येवला-भारम
रोडवर नागडे शिवारात भारम कडून येवला बाजूकडे येणार्या अज्ञात वाहनाने
योगेश बारे (वय१९, रा. बारे वस्ती, नगरसुल) या मोटारसायकलला (क्र.एम.एच. १५
बीयु ५२८८) धडक दिलेल्या झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार बारे हा गंभीर
जखमी झाल्याने जागीच ठार झाला. हा अपघात काल रात्री आठ वाजेदरम्यान घडला.
अज्ञात वाहनाविरूद्ध पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरा अपघात पाटोदा (ता. येवला) रोडवर ३६ चारीजवळ घडला. रुपेश रावसाहेब गवारे (वय २३, रा.शेवगे सातारे) मोटारसायकल (क्र. एम.एच.१५ सीए ५७७२) हिचेवर पत्नी सपना (वय २0) व दोन लहान मुलांना घेवून पाटोद्याकडे रात्री ८.३0 वाजेच्या सुमारास जात असताना मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने नालीत जावून पडला. झालेल्या अपघातात पत्नी सपना हीच डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाली. दरम्यान, पंचायत समितीचे सदस्य रतन बोरनारे व संपत बोरनारे हे पाटोद्याकडे जात असताना त्यांनी जखमींना मदत केली प्रथम ग्रामिण रूग्णालय, त्यानंतर शिर्डी व नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सपनाचा मृत्यू झाला. चालक रूपेश याचा हात अपघातात फ्रॅक्चर झाला पोलिसांनी पती रूपेश याच्या विरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास हवालदार बापूसाहेब शिंदे, चेतन बागूल करत आहेत. |