येवला - येथील भाजपाच्या शहर व तालुका कार्यकर्त्यांची बैठक
जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली र्मचंट बँकेतील डॉ.
हेडगेवार सभागृहात पार पडली.
भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री विठ्ठलराव चाटे, ज्येष्ठ मोहन शर्मा यांनी पक्षाची भूमिका विशद केली. धनंजय कुलकर्णी, प्रमोद सस्कर, बंडू क्षिरसागर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. मान्यवरांचा सत्कार तालुकाध्यक्ष गोरख खैरनार यांनी केला. प्रास्ताविक शहराध्यक्ष मनोज दिवटे यांनी केले. यावेळी शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. उपाध्यक्ष राजेंद्र नागपुरे, अमर छतानी, राजेंद्र बाबर, दत्तुसा वाडेकर, सरचिटणीस बापू भाडेकर, विशाल काथवटे, चिटणीस मच्छिंद्र मोरे, संजय कुक्कर, श्रीराम लक्कडकोट, शंतनू हंडी, कोषाध्यक्ष पंकज पहिलवान, कार्यप्रमुख भानुदास गायकवाड आदी तसेच युवा मोर्चा शहराध्यक्ष राम बडोदे, उपाध्यक्ष सचिन खरात, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष म्हणून सुहास घाटकर, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष हुसेन शेख आदींची निवडीची यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. आभार बापू गाडेकर यांनी मानले.