येवला - नगरसूल जवळील वडाच्या मळ्याजवळ मंगळवारी दुपारी एका पिकअप जीपला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे पिकअप जीप पलटी झाली. त्यामधुन प्रवास करणारे १९ प्रवासी जखमी झाले आहे. त्यातील ६ गंभीर असल्याचे समजते. सदर प्रवासी हे मातुळठाण येथील म्हसोबाला बोकड कापण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. आदिवासी भिल्ल समाजातील भाविक असल्याचे समजते. गंभीर जखमींना नाशिक सिव्हील हॉस्पिटल येथे हलवण्यात आले असून जखमीची विचारपूस बाळासाहेब लोखंडे व नगरसेवक रवि जगताप यांनी केली . या प्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला असुन तपास सुरु आहे.