येवला - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती येवले शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शिवसेने तर्फे शनीपटांगणवरील शिवसेना येथून शिवसेना ग्रामिण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, जिल्हा बँकेचे माणिकराव शिंदे,नगराध्यक्ष निलेश पटेल माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, किशोर सोनवणे आदिच्या उपस्थितीत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
शिवजयंतीच्या मिरवणुकीत मावळे भालदार चोपदार, छ.शिवराय यांच्या वेशभूषा आकर्षणाचे केंद्र होते. तसेच मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधवाच्या ऐक्याचे दर्शन घडले. मिरवणुक शनी पटांगण, विंचूर चौफुली , जब्रेश्वर रोड, काळा मारुती, शहर पोलिस ठाणे,देवी खुंट, टिळक मैदान येथे मिरवणुकीची सांगता झाली. दरम्यान देवी खुंटावर मिरवणुक आली असता नगरसेवक शेख मुश्ताक, शेख निस्सार, रफियोद्दीन काजी यांनी मिरवणुकीचे स्वागत करीत मिरवणुकीतील मान्यवरांचा सत्कार केला तसेच मिरवणुकीत सामील झालेल्यांना पाण्याचे पाऊच व बिस्किटे वाटप करण्यात आले. शहर व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाले होते.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख वाल्मिक गोरे,तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे, भोलानाथ लोणारी,बाबा थेटे, धिरज परदेशी, रुपेश लोणारी, चंद्रकांत शिंदे, आनंद शिंदे, महेश सरोदे,राहुल लोणारी, सर्जेराव सांवत,दत्ता काळे, अमित अनकाईकर,सतिष कायस्थ,निस्सार सौदागर,एकबाल गाजी,अमोल सोनवणे,येमकोचे चेअरमन राजेश भांडगे, प्रमोद सस्कर, संतोष परदेशी, नगरसेवक बंडू क्षिरसागर, माजी नगराध्यक्षा सुंदरअक्का लोणारी आदीसह मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी सामिल होते.
छावा संघटना व शिवसेना देवी खुंट शाखेच्या वतीने देवी खुंट येवला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवपुतळ्याचे पुजन छावा संघटनेचे संजय सोमासे, शिवसेना शहर प्रमुख महेश सरोदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंती निमित्त देवी खुंट परिसरात भगव्या पताका , झेंडे लावण्यात आले होते. तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक भदाणे, उमेश सपकाळ, संतोष मोरे , सचिन शिंदे, दिपक परदेशी, विकी कवाडे, शुभम भावसार, दिलीप बाबर, आदीनी विशेष परिश्रम घेतले.
शहरातील पाटोळे गल्लीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . आज सकाळी छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेतून स्वातंत्रपुर्व काळापासूनची पंरपरा जोपासणारी मिरवणुक शहरातील विविध भागातून काढुन पाटोळे गल्लीत सांगता करण्यात आली. माजी नगरसेवक सुभाष पाटोळे, युवराज पाटोळे यांनी या मिरवणुकीचे संयोजन केले होते.