येवला - शहरातील देवीखुंट परिसरातील अवैध धंदे
तातडीने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शहर शिवसेनेने दिला आहे.
देवीखुंटासमोर ओट्यांवर रात्रीच्या दरम्यान अवैध धंदेवाल्यांची चलती असते.
त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांसह महिलावर्गालाही याचा त्रास सहन करावा
लागत आहे. रात्री उशिरापर्यंत अवैध धंदेवाल्यांची या ठिकाणी गर्दी असते.
याबाबत शहर पोलिसांना शिवसेना पदाधिकार्यांनी माहिती देऊनही या गैरप्रकारांना
आळा बसला नसल्याचे पत्रकात शिवसेना उपशहरप्रमुख महेश सरोदे व विभागप्रमुख
दीपक भदाणे यांनी म्हटले आहे. देवीखुंटावरील अवैध धंदे त्वरित बंद न केल्यास
शहर शिवसेनेने आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.