अंदरसूल गावातील अंगणवाडी क्रमांक सहाबाबतची चौकशी करून
संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन व उपोषणचा
पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा सेनेचे उपतालुकाप्रमुख झुंजार देशमुख
यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले की, अंदरसूल गावातील अंगणवाडी क्र. ६ चे मंजूर झालेले काम प्रगतीपथावर असतानाच ठेकेदार व इंजिनिअर यांनी या कमाची पूर्ण रक्कम ३१ मार्च रोजीच काढली; मात्र काम अपूर्णावस्थेतच आहे. सदर कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा सेनेच्या वतीने आंदोलन, तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबू, असे म्हटले आहे. कारवाई न झाल्यास आपण फौजदारी गुन्हा दाखल करू, असे झुंजार देशमुख यांनी सांगितले. निवेदनावर झुंजार देशमुख, दीपक देशमुख, (छावा तालुकाप्रमुख), अभिजित देशमुख (युवा सेना) आदींच्या स्वाक्षर्या आहेत.