येवला - येथील विठ्ठलनगरमध्ये राहणारी उज्ज्वला जैन (वय ३८) ही
विवाहित महिला दुपारी चार वाजता घरातून बेपत्ता झाली आहे. सदर महिला रंगाने
गोरी, अंगात सफेद रंगाची ठिबक्यांची साडी, ब्लाऊ ज, गळ्यात मंगळसूत्र,
चेहरा उभट, पायात काळी चप्पल अशा वर्णनाची बी.ए. शिक्षित परंतू मतिमंद आहे.
घरात काहीही एक न सांगता ती निघून गेली. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद
करण्यात आली असुन अधिक तपास हवलदार प्रविण वनवे करित आहेत.