येवला - येथील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने श्री चौंडेश्वरी देवी
मूर्ती पुन:प्राणप्रतिष्ठेनिमित्त 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान विविध
उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.12 रोजी सकाळी 8.30 वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होईल. दुपारी 2 वाजता वास्तू मंडळ स्थापन, योगीन मंडल स्थापन आरती व प्रसाद सायंकाळी 6 ते 8 प्रवचन, गुरुवारी 14 रोजी सकाळी 9 वाजता श्री चौंडेश्वरी देवी मूर्तीसह पालखीची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. नगराध्यक्ष निलेश पटेल, तहसीलदार हरीश सोनार, मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर आदींच्या उपस्थितीत दि.15 रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजता शहरातील फत्तेबुरुज नाका येथे देवांग श्री दयानंदपुरीजी महास्वामी यांचे आगमना प्रित्यर्थ पूजन व मिरवणूक स्वागत समारंभ, स्मरणिका प्रकाश सोहळा तसेच सायंकाळी 5 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या सोहळ्यास राज्यभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजाची कुलदेवता चौंडेश्वरी माता मूर्तीचा पूर्णप्राणप्रतिष्ठा, नवचंडी, वसंत, पंचमी महोत्सव श्री क्षेत्र हंपी (कर्नाटक राज्य) येथील दयानंदपुरीजी (हेमकुटे) प.पू. सुधांशूजी महाराज यांचे शिष्य अरुण शाळू महाराज यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन मातेचा सोहळा होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त गोपाळ बाबर, अध्यक्ष मनोज भागवत, उपाध्यक्ष दत्तात्रय नागडेकर, सचिव कैलास घटे आदींनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. |