अंदरसूल - पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अपूर्णावस्थेत
असलेल्या कामाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित परिषदेत ना. छगन भुजबळ यांनी या
कामी स्वत: लक्ष घालून जनतेशी संवाद साधावा, असा सूर उमटला.
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून
बंद असून, ते कधी पूर्णत्वास येईल, अशी चर्चा सध्या परिसरातील
शेतकर्यांमध्ये सुरू आहे. या वस्तुनिष्ठ परिस्थितीबाबत भुजबळ यांनी जनतेशी
संपर्क साधून ही समस्या त्वरित मार्गी लावली पाहिजे, अशी अपेक्षा
शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित
केलेल्या परिषदेत विजय पठाडे, भाऊलाल सोनवणे, बद्रीनाथ कोल्हे, भाऊ लहरे,
संजय पगारे, पंडित मेहकर, जितू जहागीरदार, गोरख नेवासकर, संतू पाटील झांबरे
आदींनी मार्गदर्शन करताना सूचना केल्या. याप्रसंगी दिनकर लोहकरे, रामभाऊ घोडके, जगन्नाथ भोसले, विठ्ठल बोरसे, विठ्ठल दारुंटे, मारुती वाकचौरे, दादा पाटील नेहे, कोंडिराम सोनवणे, पोपट एंडाईट, संजय ढोले आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संजय मिस्तरी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश जहागीरदार यांनी आभार मानले. |