ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या बैठकीत शासनाचा निषेध

येवला - तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष कॉ. राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

शासनाने ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी तुटपुंजे वेतन व मानधन देऊ केलेली घोषणा व त्या घोषणा प्रस्तावाचा निषेध बैठकीत करण्यात आला. महागाईच्या काळात सेवकांची शासनाने थट्टाच केली असल्याचे बैठकीत म्हटले असून, या विरोधात दि. 20 फेब्रुवारी रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयटकतर्फे करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सुनील बनकर, भगवान रोठे, राजु नवले, दत्तात्रय चव्हाण, किसान सभेचे अध्यक्ष बाबासाहेब कातुरे, कोटमगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर लहरे, आदींसह सर्व ग्रामरोजगार उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने