येवल्यातील भूमिगत गटार योजनेस मंजुरी

येवला- येवला शहराकरिता केंद्र शासनपुरस्कृत यूआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेचा प्रस्तावास जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. नगरपालिकेने भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सन २00८ मध्ये जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीकरिता सादर केला होता. ४0.0 कोटी रुपये खर्चाच्या सदर प्रस्तावास १४ जानेवारी रोजी मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मंजुरी दिली होती. १६ व्या राज्यस्तरीय मंजूर समितीमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यावेळी सुधारित प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली गेली. सुधारित प्रस्ताव पुन्हा तांत्रिक मंजुरीकरिता जीवन प्राधिकरणाकडे सादर केला असता २0 फेब्रुवारी रोजी ४२.१0 कोटी रुपये खर्चाच्या सदर सुधारित प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली. पालिका सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने