माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पालकमंत्र्यांचा तालुका असलेल्या येवला येथे
पंचायत समितीला विस्तार अधिकारी नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ठप्प झालेली
असल्याचे चित्र असतानाच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे
येवल्याला पंचायत समिती विस्तार अधिकारीपदी पदोन्नतीने ज्ञानेश्वर सपकाळे
यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वडाळीभोई येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे यांची विशेष मागास प्रवर्गातून विस्तार अधिकारी (पंचायत) पदासाठी येवल्यात पदोन्नती करण्यात आली आहे. येवल्या बरोबरच अन्य चार तालुक्यांतही ग्रामविकास अधिकारी पदातून विस्तार अधिकारी (कृषी) या पदावर चार जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात खुल्या संवर्गातून मालेगाव येथे बबन संतोष बोरसे, प्रवीण गणपत गायकवाड यांची त्र्यंबकेश्वर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून कृष्णा काळू बागुल यांची निफाडला तर विजय रामकृष्ण शंकपाळ यांची विशेष मागास प्रवर्गातून मालेगाव येथे विस्तार अधिकारीपदी (कृषी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. येवला येथे विस्तार अधिकारी पद रिक्त असल्याने अनेक योजना रखडल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी मागील सर्वसाधारण सभेत केला होता.