येवला - सक्तीच्या वीज बिल वसुलीसाठी गेल्या आठ
दिवसांपूर्वी महावितरणने तालुक्यातील चिचोंडी वीज उपकेंद्रांतर्गत येणारे
रोहित्र बंद करून कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद केल्याने आज चिचोंडी बुद्रुक,
चिचोंडी खुर्द निमगाव मढ व साताळी परिसरातील शेतकर्यांनी वीज उपकेंद्रालाच
कुलूप ठोकले. दरम्यान, तासाभराच्या आंदोलनानंतर हादरलेल्या महावितरणने
रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर शेतकर्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबासाहेब थेटे, गणप्रमुख विशाल देवडे, निमगावमढ विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन किशोर लभडे, सयाराम लभडे, सुदाम लभडे, जनार्दन दिवटे, अरुण आहेर, संदीप आंबेकर, शिवाजी गवळी, रामदा दिवटे, सखाहरी दिवटे, लीलाबाई दिवटे आदींसह शेतकर्यांनी आज सकाळी ११ वाजता चिचोंडी बुद्रुक येथील ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राला कुलूप ठोकले. महावितरणने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी या वीज उपकेंद्रांतर्गत येणारे आठ ते नऊ रोहित्रे बंद केली होती. तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना विहिरींमधील पाण्याने तळ गाठला असून काही विहिरी तर कारेड्याठाक आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही बिकट प्रश्न असताना महावितरणने रोहित्रेच बंद केल्याने परिसरातील शेतकर्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठाच बंद झाला. पर्यायाने ज्या शेतकर्यांच्या विहिरींना पाणी आहे त्या शेतकर्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने आज महावितरणच्या सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात शेतकर्यांनी दंड थोपटले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांनी या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ज्या शेतकर्यांच्या विहिरींना पाणी आहे, त्या शेतकर्यांकडील थकती वीज बिले वसूल करा, मात्र ज्या शेतकर्यांच्या विहिरीच कोरड्या आहेत त्यांना सक्तीच्या वीज बिल वसुलीतून वगळावे अशी मागणी बाबासाहेब थेटे व साहेब राव मढवई यांनी लावून धरली. कनिष्ठ अभियंता पी. एस. बोरसे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून विहिरींना पाणी असलेल्या आठ ते दहा शेतकर्यांचे जागेवरच थकीत वीज बिले भरून घेतली व त्यानंतर रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मग आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेत वीज उपकेंद्राच्या कार्यालयाला ठोकलेले कुलूप काढून घेतले.
तासाभरानंतर कनिष्ठ अभियंता पोहोचले
शेतकर्यांची आंदोलन सुरू केल्यानंतर महावितरणचे कनिष्ठ अभियंता पी. एस. बोरसे हे चिचोंडी येथील वीज उपकेंद्राच्या कार्यालयावर पोहोचले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबासाहेब थेटे व आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी कठोर भूमिका घेतली. तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला असताना महावितरणने रोहित्रे बंद करून व सक्तीची वीज बिल वसुली आणून शेतकर्यांवर अन्याय चालविला असल्याचे बाबासाहेब थेटे यावेळी म्हणाले, सक्तीची वीज बिलवसुली त्वरित थांबवावी असे आवाहन थेटे यांनी यावेळी केले