येवला - राज्यातील जनतेच्या संकटसमयी सुख-दु:खाशी समरस होऊन रयतेचे
हित जपणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा आदर्श घेऊन
शासनाने दुष्काळाच्या परिस्थितीतून मार्ग काढून शेतकरी बांधव व
दुष्काळग्रस्त जनतेला सर्वोतोपरी मदत करावी, असे प्रतिपादन 'रायगड ग्रुप'चे
संस्थापक व ना.जि.म. बँक संचालक अँड़माणिकराव शिंदे यांनी केले. येवला तालुका व शहर रायगड ग्रुपच्या वतीने या वर्षापासून शासकीय शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अँड़ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय, सामाजिक बांधिलकीविषयी सविस्तर मार्गदर्शन करत अठरापगड जातींना बरोबर घेऊन कुठेही जातीभेद न करता राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक उदाहरणांसह त्यांनी स्पष्ट केले. येवला-लासलगाव मतदार संघामध्ये गाव तेथे रायगड ग्रुपची शाखा हे अभियान लवकरच राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष नीलेश पटेल, मुख्याधिकारी दिलीप मेनकर, पोलीस निरीक्षक o्रावण सोनवणे, सहाय्यक निरीक्षक खेडकर, तालुका निरीक्षक शिरसाठ, बाळासाहेब लोखंडे, नगरसेवक रिजवान शेख, सुनील काबरा, प्रदीप सोनवणे, जिनिंग प्रेसिंग चेअरमन खंडेराव जाधव, माजी पं.स. सभापती विठ्ठलराव शेलार, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन दामू पवार, भाजपा नेते धनंजय कुलकर्णी, र्मचंट बँक माजी चेअरमन दिनेश आव्हाड, रायगडचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष सुदाम सोनवणे, अशोक संकेलचा, माणकभाऊ शर्मा, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, अरविंद शिंदे, डॉ. संकेत शिंदे, अँड़ शाहू शिंदे आदींनी पुष्पांजली अर्पण केली. माजी नगरसेवक बालमुकुंद जगताप, मनीष काबरा, नितीन काबरा, एकनाथ गायकवाड, सनी पटणी, संतोष परदेशी, धिरज परदेशी, गौतम मंडलेचा, लाला कुक्कर, अशोक शाह, अनिल मुथा, उमेश पटेल, बाळू गायकवाड, गोल्डी आहुजा, जानकीराम खांडेकर, शिवाजी गाढे, कुरेश तालीब, शेरु मोबीन, नारायण गायकवाड, नंदू दाणे, दिलीप गांजे, शिवाजी येवले, राजेश कदम, अमोल शिंदे, अरविंद शिंदे, गणेश शिंदे, संजय शिंदे, महेंद्र पवार आदींसह रायगडचे शहरातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भागुनाथ उशीर यांनी केले. |