येवला
तालुक्यातील चिचोंडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. चंद्रकला
मढवई यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. तहसीलदार हरिष सोनार
यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा संपन्न झाली. सभेत
सरपंच सौ. मढवई यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने आठ पैकी सहा
सदस्यांनी मत नोंदविले. बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. सभेस सारिका
कासलीवाल वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. सरपंच सौ. मढवई ग्रामपंचायत
कारभार करताना सदस्यांना विश्वासात घेत नाही व विकासकामात अडथळा आणतात
म्हणून सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.
|