येवला विंचूर चौफूलीवर नगर पालिकेने १०-१२ दिवसापासून जलवाहिनी दुरुस्तीसाठी खड्डे खणलेले होते. ते कामाची आज पुर्तता करुन नगरपालिकेन फक्त मुरुम काढुन ते खड्डे भरलेले असताना त्यात एक उसाने भरलेला ट्रक फसला आणि तो उलटला गेला त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुच्या अर्धा भागात उस पसरला गेला. सुदैवाने त्या उसाखाली येताना दोन पादचारी बचावले. नगरपालिकेने खुप दिवसापासून हे काम चालविल्याने नाशिककडे जाणारी वाहतुक पंचायत समितीपर्यंत एकेरी केलेली होती. तसेच या खड्ड्याची दुरुस्ती योग्य पध्दतीने न केल्यामुळे सदर अपघात झाला असुन नगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराने नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. या कामास एवढा विलंब लागावा एवढे सुध्दा काम मोठे नव्हते पण मुख्याधिकारी यांचे ढिसाळ नियोजन व पाणी पुरवठा अधिकारी योग्य दर्जाचा नसल्याने सदर अपघात घडला असून दोषींवर कारवाई करावी अशी चर्चा आहे.