येवला - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या
निर्देशानुसार येवला न्यायालयातील पल्रंबित दाव्यांमध्ये तडजोड घडवून
आणण्याचा आणि न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी येत्या 3 मार्च रोजी
येवला न्यायालय आवारात महालोक अदालत घेण्यात येणार आहे, अशी माहिती
न्यायाधीश एस.डी. कुलकर्णी यांनी येवला न्यायालयात झालेल्या एका बैठकीत
दिली.वकील व अन्य शासकीय विभागांचे अधिकारी यांच्या बैठकीत बोलताना
न्यायालयातील सर्व पतसंस्थेचे पल्रंबित दावे, तसेच कौटुंबिक दाव्यांचा
सामंजस्याने वाद मिटवून प्रकरणे निकाली काढण्यासाठी महालोक अदालतचा उपयोग
वकील, पक्षकार यांनी करून घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.सहा.
न्यायाधीश एस. डी. थोरात, अँड. डी. एन. कदम, अँड. बी. डी. देशमुख, अँड.
दत्तात्रय चव्हाण, तहसीलदार हरीष सोनार, गटविकास अधिकारी अजय जोशी, पालिका
मुख्याधिकारी दिलीप मेनकर, पो.नि. श्रवण सोनवणे आदींची यावेळी समायोचित
भाषणे झाली. यावेळी पो. नि. सुरेंद्र शिरसाठ, अँड. प्रदीप पाटील, अँड. पी.
एम. गायकवाड, अँड. पगारे, अँड. जहागीरदार, अँड. दिलीप कुलकर्णी, अँड. घुले,
अँड. खैरनार आदींसह पतसंस्थेचे व्यवस्थापक साहेबराव आहेर, मनोज शेळके,
जगन्नाथ जाधव, प्रेमराज शिरसाठ उपस्थित होते.