नगरसूल- येवला- नांदगाव महामार्गावर नगरसूल रेल्वे गेटजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. नगरसूल रेल्वे गेट बंद असल्याने याठिकाणी ट्रक (एमएच १५ बी-१७३) उभा होता.
पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या बजाज फोर एस दुचाकीने (एम. एच. १५
-१७६२)ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल
वरील हरी वसंत आव्हाड (४५) व पांडू संपत चकोर (२५) हे दोघेही जागीच ठार झाले. ते निफाड तालुक्यातील खामगावतळी येथील रहिवाशी होते. याप्रकरणी येवला पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे
वरील हरी वसंत आव्हाड (४५) व पांडू संपत चकोर (२५) हे दोघेही जागीच ठार झाले. ते निफाड तालुक्यातील खामगावतळी येथील रहिवाशी होते. याप्रकरणी येवला पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे