येवला -
येवला कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित युवा
सप्ताहाचे उद्घाटन डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते. प्रारंभी
प्रतिमापूजन केले गेले. डॉ. कुलकर्णी यांचे स्वामी विवेकानंद यांचे जीवनावर
व्याख्यानही संपन्न झाले. उपप्राचार्य डॉ. गमे यांनी राजमाता जिजाऊ
यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख यावेळी मांडला. प्रास्ताविकात प्रा.
एन.डी.गायकवाड यांनी सप्ताहकाळात राबविण्यात येणार्या विविध कार्यक्रमांची
माहिती दिली. सूत्रसंचलन प्रा. डॉ. प्रकाश वानखेडे यांनी तर आभारप्रदर्शन
प्रा. श्रीमती चंद्रकला शेवाळे यांनी केले. रासेयो स्वयंसेवक दिपक डोंगरे,
गणेश गायकवाड, शिवाजी गायके आणि सहकार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष
परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व
विद्यार्थी उपस्थित होते.