येवला तालुक्यातील धुळगाव परिसरात सर्रासपणे अवैध
दारूचे अड्डे असून, विक्री तेजीत सुरू आहे. हे अवैध धंदे त्वरित बंद
करण्याची मागणी येवला ग्रामीण पोलीस स्टेशनला तीन महिन्यांपूर्वी करीत अर्ज
दिला आहे; मात्र धंदे बंद होत नसल्याची खंत भारतीय बहुजन सेनेचे धुळगाव
गणप्रमुख शशिकांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. जे नशेमध्ये गैरकृत्यही
करण्यास घाबरत नाही यांना वेळीच मुसक्या घालाव्यात, अशी मागणी जगताप यांनी
केली असून, वरिष्ठ अधिकार्यांनी संबंधित अवैध धंदे त्वरित बंद करावे,
अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असेही जगताप यांनी म्हटले आहे.