येवला - कोटमगाव (देवीचे) येथील चोरीच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी येथे रविवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी
बोलताना खासदारांनी कोटमगाव येथे वर्षभर भाविकांची रेलचेल असते.
नवरात्रीव्यतिरिक्त राज्यभरातील भाविक पौर्णिमा, सण, समारंभ, मंगळवार,
शुक्रवार असे विशेष दिनाचे औचित्य साधून देवीच्या दर्शनाकरीता, नैवेद्य,
नवसपूर्तीकरीता कोटमगावला येत असतात. सुरक्षेच्या ष्टीने येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी, जेणे करून येणार्या भाविकांबरोबरच देवीच्या परिसरात व मंदिरात सुरक्षेची भावना निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. येवला येथील राधाकृष्ण लॉन्सवर आयोजित मराठा वधू-वर सूचक परिचय मेळाव्यास यावेळी खा. चव्हाणांनी भेट दिली, तसेच विज्ञान प्रदर्शनातून पुरस्कार मिळालेले चंद्रशेखर दंडगव्हाळ तसेच सी. ए. परीक्षेत येवला तालुक्यात मुलींमध्ये प्रथम मान प्राप्त झालेल्या प्राची गुजराथी हिचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन खासदारांनी केला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज दिवटे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, युवा सेनेचे रूपेश लोणारी, युवा मोर्चाचे राम बडोदे, शहर भाजपा सरचिटणीस बापू गाडेकर, भानुदास गायकवाड, राजेंद्र नागपुरे, भगवान काळे, नाना लहरे, बाबूराव कोटमे आदींची उपस्थिती होती. |