येवला, दि. 11 - अंगणगाव ग्रा.पं. मागणीवरून बोटिंग क्लबमध्ये पाणी सोडण्याची
शिफारस केली, तशी टंचाईग्रस्ती कृती आराखडय़ातील व 38 गाव पाणीपुरवठा
योजनेतील 20 गावांचे गावतळे भरून देण्याची शिफारस आपण पालखेड पाटबंधारे
खात्याला करावी व पाणी वापर सहकारी संस्थांच्या लाभक्षेत्रातील ग्रामीण
भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे म्हणजे ग्रामीण
भागातील नागरीकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
होईल, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी पालिकेचे
मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आम्ही वेळोवेळी पाटबंधारे खाते, जिल्हाधिकारी पालकमंत्री आदींना विनंती करूनही पिण्यासाठी पालखेडचे पाणी देण्यात आलेले नाही; मात्र आपल्या शिफारशीवरून गरज नसलेल्या बोटिंग क्लबला पाणी दिले जाते म्हणून सोबत 20 गावांची यादी देण्यात येत आहे त्या गावांना पाणी सोडण्याची शिफारस करावी, असे निवेदनात संतु पाटील यांनी म्हटले आहे.