कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिरात
चोरी झाल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंदिरात जाऊन पाहणी
केली. मंदिराच्या पाहणीनंतर भुजबळांनी विश्वस्तांना मंदिराचा कारभार पाहणे
शक्य होत नसेल तर मंदिराचा कारभार सरकारकडे वर्ग करा, असे आव्हान
विश्वस्तांना दिले.
जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे आज येवला तालुक्यात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी मतदारसंघाच्या दौर्यावर आले होते. कोटमगावात अज्ञात चोरट्यांनी चांदीच्या तीन छत्र्यांसह सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी केली होती. भुजबळांनी भक्तांचे र्शद्धास्थान असलेल्या मंदिराची आज सकाळी 11.30 वाजता जाऊन पाहणी केली. मंदिरात गेल्यानंतर जगदंबा देवीचे भुजबळांनी दर्शन घेतले. यानंतर चोरट्याने मंदिरात चोरी कशी केली व तपास याबाबतची माहिती मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समाधान पवार यांनी भुजबळांना दिली.
मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी विश्वस्तांची असते. भाविक र्शद्धेच्या माध्यमातून आपला पैसा दानपेट्यात टाकतात. त्याचा सांभाळ करण्याचे काम विश्वस्त मंडळाचे आहे. देवीचे दागिने, दानपेट्यांची सुरक्षा व देखभाल विश्वस्तांना शक्य होत नसेल तर मंदिराचा कारभार सरकारकडे वर्ग करा. मंदिराचे उत्पन्न विश्वस्त मंडळाला मिळत असताना मंदिराच्या सुरक्षेसाठी विश्वस्तांनी चौकीदाराची नेमणूक का केली नाही, असा सवालही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. मंदिराच्या खिडक्या, दरवाजे मजबूत केले पाहिजेत. शासनाच्या अनुदानातून आठ कोटी रुपयांची विकासकामे आम्ही मंदिर परिसरात सुरू केली आहेत, मग विश्वस्तांना सुरक्षेचे बघता येत नसेल तर त्यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हावे, धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून कारभार शासनाकडे सोपवा, आम्ही सरकारच्या वतीने चांगले माणसे बसवून कारभार सांभाळू, असे आव्हान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.