येवला - येवला-वैजापूर रोडवर काले पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी 10
वाजेच्या सुमारास इनोव्हा कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात
मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. येवला-वैजापूर रोडवर अंदरसूलजवळील काले पेट्रोल पंपावरून माधवराव गवनाजी साप्त (वय 65, रा. अंदरसूल, ता. येवला) हे आपल्या मोटारसायकल(क्र. एमएच 15 सीएन 7279) मध्ये पेट्रोल भरून बाहेर रोडवर येत असताना येवला बाजूकडून वैजापूरकडे जाणारी इनोव्हा कारने (क्र.एमएच 04 डीई 5663) मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील माधवराव साप्ते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले.इनोव्हा कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अधिक तपास पो.उ.नि. आर. के. माळी, हवालदार ठोंबरे करीत आहेत. आठवडाभरात मोटरसायकलच्या झालेल्या विविध अपघातात नऊ जण ठार झाले आहेत. |