येवला -
तालुक्यातील धामणगाव येथील महादेव वाडीवर एका कोपीस आग लागून सुमारे २५
हजारांचे नुकसान झाले. रवींद्र नवृत्ती पवार यांच्या राहात्या कोपीस आज,
दुपारी २ वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागली. या आगीत संसारोपयोगी
साहित्यासह अन्नधान्य, कागदपत्रे व रोख रक्कम दोन हजार असे एकूण २५ हजार
रुपयांचे नुकसान झाले. सदर घटनेचा तलाठी डी.एन. वाघ यांनी पंचनामा केला.
पंचायत समिती सदस्य संभाजी पवार, रतन बोरणारे यांनी आपादग्रस्त पवार यांनी
आर्थिक मदत केली.