येवला,- राऊळ समाज बहुउद्देशीय विकास संस्थेचा (नाशिक) जिल्हा मेळावा
संस्थाध्यक्ष व आदिवासी भटक्या विमुक्त जातीचे नेते शरद राऊळ यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून भटक्या विमुक्त संघाचे प्रदेश सरचिटणीस माणिक लोणारे, अजिंक्यतारा शि.प्र. मंडळाचे प्रकाश कोल्हे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य किशोर सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार व राऊळ समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन शरद राऊळ यांचे हस्ते करण्यात आले. समाज संघटन, समाजाच्या अडीअडचणी, वधूवर मेळावा आयोजन करुन सामुदायिक विवाह करणे, सभागृह वाचनालय तसेच शैक्षणिक स्वयंरोजगार आदी विषयांवर राऊळ यांनी मार्गदर्शन केले. पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविले जातील, असेही राऊळ यांनी यावेळी सांगितले. घोटी येथील समाज शाखेतर्फे स्वखर्चाने दिनदर्शिका तयार केली. शाखाध्यक्ष संदीप डावखरे, सुधाकर डावखरे, देविदास वंजारी, उमेश दिवाकर, गोपीचंद डावखरे, योगेश निकम, सुनील डावखरे, किशोर चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेवून दिनदर्शिका लोकार्पण केली.सदर मेळाव्याचे आयोजन येवला शाखाध्यक्ष वाल्मिक राऊळ, मुकुंद पवार, अर्जून महाडिक, राकेश कातेरे, रमेश राऊळ, अतुल भालेरे, महेश भालेरे, महिला पदाधिकारी प्रियंका राऊळ, संगीता भालेरे, विजया व भालेरे, माया गुळस्कर, सुरेखा भालेरे आदींनी केले. सूत्रसंचालन राकेश भालेरे, आभार विष्णू भालेरे यांनी मानले. |